Sameer Panditrao
परफेक्ट बॅटर कसा पाहिजे याबद्दल नुकतेच वीरेंद्र सेहवागने एका मुलाखतीत सांगितले.
त्याचा कव्हर ड्राइव्ह आणि फ्लिक शॉट विराट कोहलीसारखा पाहिजे.
त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह सचिन तेंडुलकरसारखा हवा असे सेहवाग म्हणतो.
रोहित शर्मासारखा पूल शॉट मारता आला पाहिजे असे सेहवागने सांगितले.
स्वतः सेहवागसारखा कट शॉट त्या खेळाडूला खेळता आला पहिजे.
त्या बॅटरचा स्कूप शॉट दिलशानसारखा परफेक्ट असला पाहिजे.
त्या बॅटरला स्विच हिट डेव्हिड वॉर्नरसारखी खेळता आली पाहिजे असे सेहवागचे मत आहे.