MI VS DC: केएल राहुल मुंबई इंडियन्सविरुद्ध रचणार इतिहास, फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

Sameer Amunekar

आयपीएल

रविवार १३ एप्रिल रोजी होणारा हा सामना चाहत्यांसाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे.

MI VS DC | Dainik Gomantak

दिल्ली कॅपिटल्स विरूध्द मुंबई इंडियन्स

चाहत्यांना जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल.

KL Rahul | Dainik Gomantak

जबरदस्त फॉर्म

दिल्लीचा संघ या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, हा एकमेव संघ आहे ज्याने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही.

KL Rahul | Dainik Gomantak

केएल राहुल

दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये नवीन हंगामाची सुरुवात केल्यानंतर, केएल राहुल आता त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध फक्त ५३ चेंडूत ९३ धावांची खेळी केली.

KL Rahul | Dainik Gomantak

इतिहास रचणार

दिल्ली कॅपिटल्सचे लक्ष अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्यांच्या पुढील सामन्यावर आहे. या सामन्यात केएल राहुल त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दोन महान कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

KL Rahul | Dainik Gomantak

२०० षटकार

आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करण्यासाठी राहुलला फक्त तीन षटकारांची आवश्यकता आहे. जर केएल राहुलने त्याचा जुना फॉर्म कायम ठेवला तर तो हा टप्पा सहज गाठू शकतो.

KL Rahul | Dainik Gomantak

१००० धावा

केएल राहुलला मुंबई इंडियन्सविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ५० धावांची आवश्यकता आहे. जर त्याने असे केले तर तो मुंबई इंडियन्सविरुद्ध १००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरेल.

KL Rahul | Dainik Gomantak
Largest Cannon In India | Dainik Gomantak
सर्वात मोठी तोफ कोणाकडे होती?