Manish Jadhav
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचे उन्हाळ्यात लोक मोठ्याप्रमाणात सेवन करतात.
आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. आज (27 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या लोकांना आंब्याचे सेवन फायदेशीर ठरत नाही याबाबत जाणून घेणार आहोत...
आंब्याच्या सालीत असलेल्या ‘युरुशिओल’ या रसायनामुळे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते.
किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आंबा धोकादायक आहे. आंब्यात असलेले पोटॅशियम या आजाराच्या लोकांसाठी धोकादायक ठरु शकते.
काही लोकांना आंबा खाण्याचा मोह आवरत नाही. आंब्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात दुखणे, गॅस होणे किंवा जळजळ होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतो किंवा उष्माघात होण्याची शक्यता असते, त्यांनी आंब्याचे अतिसेवन टाळावे.