Fort History: शिवजन्मापूर्वीचा तो हुंकार...! 'या' किल्ल्यावरच शहाजी महाराजांनी रचला हिंदवी स्वराज्याचा अजेय पाया

Manish Jadhav

ऐतिहासिक ओळख

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वसलेला 'पेमगिरी' (भीमगड उर्फ शाहगड) हा किल्ला यादवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

स्वराज्य निर्मितीचा पहिला प्रयत्न

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी याच किल्ल्यावरुन स्वराज्य निर्मितीचा पहिला धाडसी प्रयत्न केला होता.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

निजामशाहीचे पुनरुज्जीवन

1633 ते 1636 या काळात शहाजीराजांनी मुर्तजा निजामशाह याला गादीवर बसवून याच शाहगडावरून स्वतंत्र कारभार सुरु केला होता.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

निसर्गरम्य पठार

या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विस्तीर्ण पठार. किल्ल्यावर चढताना निसर्गाचे विलोभनीय रुप आणि सह्याद्रीच्या रांगांचे दर्शन घडते.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

विशाल वटवृक्ष

किल्ल्याच्या पायथ्याशी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि पुरातन वडाचे झाड आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

पाण्याची टाकी आणि वाडे

किल्ल्यावर आजही यादवकालीन पाण्याची टाकी, तटबंदीचे अवशेष आणि जुन्या वाड्यांचे जोते पाहायला मिळतात, जे इतिहासाची साक्ष देतात.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

शहाजीराजांची राजधानी

शहाजीराजांनी काही काळ शाहगडला आपली राजधानी केले होते, ज्यामुळे या किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

गडप्रेमींसाठी आकर्षण

इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी संगमनेरवरून सहज पोहोचता येते, हा ट्रेकर्ससाठी एक उत्तम अनुभव ठरतो.

Pemgiri Fort | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

Chapora Fort | Dainik Gomantak
आणखी बघा