कमिन्सच्या पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स, अनिल कुंबळेच्या रेकॉर्डशीही बरोबरी

Pranali Kodre

बॉक्सिंग डे कसोटी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 26 डिसेंबर 2023 पासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. हा सामना 26 डिसेंबर रोजी चालू झाला असल्याने बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे.

Pat Cummins

कमिन्सच्या 5 विकेट्स

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या डावात 20 षटकात 48 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

Pat Cummins

दहाव्यांदा पाच विकेट्स

कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही त्याची 10 वी वेळ होती.

Pat Cummins

कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी

तसेच कर्णधार म्हणून बॉक्सिंग डे कसोटीत त्याने 5 विकेट्स घेतलेले असल्याने त्याने भारताच्या अनिल कुंबळेच्या एका अनोख्या विक्रमाशी बरोबरीही केली आहे.

Pat Cummins

केवळ कुंबळेच...

यापूर्वी कर्णधार म्हणून केवळ अनिल कुंबळेनेच 2007 साली मेलबर्नला बॉक्सिंग डे कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.

Anil Kumble | Dainik Gomantak

कुंबळेच्या 5 विकेट्स

दिग्गज गोलंदाज कुंबळेने 26 ते 30 डिसेंबर 2007 दरम्यान मेलबर्नला झालेल्या भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी तो भारतीय संघाचा कर्णधार होता.

कर्णधार

कमिन्स आणि कुंबळे यांच्याव्यतिरिक्त कोणालाही बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नला नेतृत्व करताना एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम करता आलेला नाही.

Pat Cummins

वनडेत एकाच वर्षात सर्वाधिक शतके करणारे संघ

Rohit Sharma - Virat Kohli