वनडेत एकाच वर्षात सर्वाधिक शतके करणारे संघ

Pranali Kodre

वनडे क्रिकेट

भारतीय क्रिकेट संघाचे 2023 मधील सर्व वनडे सामने खेळून झाले आहेत. भारताने या या वर्षात 35 वनडे सामने खेळले.

Team India

भारताची वनडेतील कामगिरी

भारताने खेळलेल्या 35 वनडेतील 27 सामन्यांत विजय मिळवले, तर 7 सामन्यात पराभव पत्करला आणि 1 सामन्याचा निकाल लागला नाही.

Mohammad Shami - Rohit Sharma | ICC

भारताचे 2023 मधील शतकवीर

दरम्यान, 2023 मध्ये भारताकडून वनडेत विराट कोहलीने 6 शतके, शुभमन गिलने 5 शतके, श्रेयस अय्यरने 3 शतके, रोहित शर्मा व केएल राहुलने प्रत्येकी 2 शतके आणि संजू सॅमसनने 1 शतक अशी एकूण 19 शतके ठोकण्यात आली.

Virat Kohli - KL Rahul | Twitter

विश्वविक्रमाची बरोबरी

त्यामुळे भारताने पुन्हा एकदा एकाच वर्षात वनडेत सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या संघांच्या यादीत आपल्याच विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

Shubman Gill - Rohit Sharma | BCCI

2017

याआधी भारतीय संघाकडून 2017 साली देखील वनडेत 19 शतके ठोकण्यात आली होती.

Rohit Sharma | X/ICC

दुसरा क्रमांक

त्याचबरोबर एकाच वर्षात सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आणि दक्षिण आफ्रिका संयुक्तरित्या आहे.

Records Of Quinton De Kock | Dainik Gomantak

1998

भारतीय संघाकडून 1998 साली वनडेत 18 शतके ठोकण्यात आली होती.

Sachin Tendulkar | Twitter/ICC

दक्षिण आफ्रिका

तसेच दक्षिण आफ्रिका संघाकडून 2015 आणि यावर्षी म्हणजेच 2023 साली वनडेत प्रत्येकी 18 शतके ठोकण्यात आली आहेत.

aiden markram | Dainik Gomantak

रोहित शर्माला नडतोय रबाडा

Rohit Sharma - Kagiso Rabada | AFP
आणखी बघण्यासाठी