Manish Jadhav
11जूनपासून लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा फायनलचा थरार रंगला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार कर्णधार पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बाद करुन लॉर्ड्सवर एक मोठा पराक्रम केला.
कमिन्सने 40व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बावुमाची विकेट घेतली. यासोबतच, लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यात विरोधी संघाच्या कर्णधाराला बाद करणारा कमिन्स हा तिसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला.
यापूर्वी, 1975 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या इयान चॅपेलने इंग्लंडच्या टोनी ग्रेगला बाद केले होते. त्या सामन्यात दोन्ही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार होते. त्यानंतर आता पॅट कमिन्सने ही किमया साधली.
मोंटी नोबल - आर्ची मॅकलरेन (1909), इयान चॅपेल - टोनी ग्रेग (1975), पॅट कमिन्स-टेम्बा बावुमा (2025)