Sameer Amunekar
कोकणातली निसर्गसंपदा आणि त्याच्या अप्रतिम निसर्गरम्य ठिकाणांची यादी खूप मोठी आहे.
पण कोकणात एक ठिकाण आहे ज्याचे सौंदर्य पाहून मन मोहित होते ते म्हणजे देवगडमधील 'न्हावनकोंड' धबधबा.
न्हावनकोंड धबधबा हा देवगड तालुक्यातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे.
देवगड हे कोकणातील एक शांत आणि हिरव्या प्रदेशात वसलेले शहर असून, येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येतात. मात्र, पावसाळ्याच्या काळात येथील निसर्ग अधिकच आकर्षक व मनोहर होतो.
न्हावनकोंड धबधबा नदीच्या प्रवाहातून तयार झालेला आहे आणि त्याचा पाणी पडण्याचा आवाज आपल्या मनात शांती व आनंद निर्माण करतो.
न्हावनकोंड धबधब्याचे पाणी थेट उंच डोंगरांवरून खाली येते आणि त्या ठिकाणी असलेले दगडी पडदे व हिरव्या वनराईने तो परिसर मनमोहक दिसतो.