Olympic 2024: ऑलिंपिकचे उद्घाटन आणि सीन नदीचे पुनरुज्जीवन

गोमन्तक डिजिटल टीम

ऑलिंपिक २०२४ उद्घाटन

ऑलिम्पिक २०२४ चे काल पॅरिसमध्ये दिमाखात उद्घाटन झाले. झळाळून उठलेला आयफेल टॉवर, अद्भुत रोषणाई आणि इतर कार्यक्रमांमुळे क्रीडारसिक आता स्पर्धांकडे डोळे लावून बसलेले आहेत.

Olympic 2024

सीन नदी

सीन नदीमध्ये हजारो खेळाडूंना घेऊन जवळपास ८५ बोटी या सोहळ्याची शोभा वाढवत होत्या. लाखो प्रेक्षक नदीच्या दोन्ही काठांवरून या सोहळ्याचा आनंद घेत होते.

Olympic 2024

'सीन' पुनरुज्जीवन गोष्ट

पण तुम्हाला सीन नदीच्या पुनरुज्जीवनाची गोष्ट माहिती आहे का?

Seine River

'प्रदूषित' नदी

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण गेली अनेक शतके सीन नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती. नदीचे पात्र जणू कचरा आणि सांडपाण्याचे आगार बनले होते.

Seine River

पोहायला बंदी

या नदीची प्रदूषण पातळी इतकी वाढली की लोकांना नदीच्या पाण्यापासून लांब ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९२३ पासून सीन नदीत पोहण्यास मनाई केली होती.

Seine River

ऑलिंपिकचे निमित्त

२०२४ चे ऑलिंपिक पॅरिसमध्ये घोषित झाले आणि त्यानिमित्याने फ्रान्सने सीन नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. २०१६-१७ पासून या मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली.

Paris France

भरीव उपाय

जवळपास १३००० कोटी सीन नदीसाठी खर्च करण्यात आले. सांडपाणी नियोजन, कचरा व्यवस्थापन, नदी खोरे स्वच्छता या मुददयांवरती सरकारने उपाययोजना आखल्या.

Seine River

महापौरांचे स्विमिंग

पॅरिसच्या महापौर ॲन हिदल्गो यांनी नदीत पोहून पत्रकारांना आणि आयोजकांना नदीच्या स्वच्छतेबद्दल खात्री करून दिली.

Anne Hidalgo

महत्वाचा संदेश

मैदानाऐवजी सीन नदीत ऑलिंपिकचे उद्घाटन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश फ्रान्सने दिला आहे. आतापर्यंतचे काम टिकवणे आणि नदी पूर्णत: खुली करणे हा त्यांचा पुढचा टप्पा असणार आहे.

Seine River

गोंयची परंपरीक नुस्तेमारी

Fishing At Goa
आणखी पाहा