गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यामध्ये मासेमारी व्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. मत्स्य आहार हा गोवन खाद्यसंस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे. गोव्यातील मासेमारीच्या अनेक पारंपारिक पद्धती आहेत. यातील काही पद्धतींची आपण माहिती घेऊ.
या मासेमारी पद्धतीत दोन किंवा अधिक लोकांची आवश्यकता असते. मच्छीमार पाण्यातून जाताना दोन्ही बाजूला बांबूच्या काड्या असलेले आयताकृती जाळे धरतात. ही पद्धत पावसाळ्यात वापरली जाते. बांबूच्या चौकटीसह अर्ध-गोलाकार जाळी वापरली जाते तिला झाली असे म्हणतात.
गोव्यातील ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. यापद्धतीत मोठ्या जाळ्याचा वापर केला जातो ज्यात मच्छिमार समुद्रात जाळे ओढत योग्य ठिकाणी नेतात आणि नंतर जाळे बंद करून पुन्हा किनाऱ्यावर खेचले जाते.
या पद्धतीमध्ये बांबूचा वापर केला जातो आणि त्यास पुढे तंगूस दोर आणि शेवटी अडक असते. अडकेच्या पुढच्या भागाला खाद्य लावून माशांना आकर्षित केलं जातं. यात आधुनिक रॉड देखील वापरले जात आहेत.
गोव्यातील नद्यांमध्ये मासे पकडण्यासाठी मच्छीमार मानस किंवा पॉईन नावाची पारंपारिक पद्धत वापरतात. या तंत्रामध्ये स्लूइस गेट्स पद्धतीचा वापर होतो. भरतीच्या ओहोटीच्या वेळी यातील जाळीच्या तंत्राचा वापर करून मासे पकडता येतात.
साधारणपणे 200-300 मीटर लांबीचे जाळे या पद्धतीत वापरतात. इथे फ्लोट्सचा वापर करून हे जाळे पसरवले जाते. ही पद्धत लहान जाळी वापरूनही करतात जी एक व्यक्ती करू शकते. मच्छीमार बोटीतून पाण्यात टाकलेले जाळे खेचतात.
खुटाणी या स्वदेशी तंत्रामध्ये मासे पकडण्यासाठी लाकडी खांबांचा वापर करून जाळे पसरवले जाते. ओहोटीवेळी जाऊन हे जाळे किनाऱ्यावर आणले जाते. पावसाळ्यात चोनक आणि डोडियारे पकडण्यासाठी ही पद्धत विशेषतः लोकप्रिय आहे.
हाताने विणलेली बास्केट वापरून मासेमारी करण्याची ही पारंपारिक पद्धत आहे ज्याला मोरिओम किंवा फिशिंग ट्रॅप म्हणतात. या विणलेल्या टोपल्यांमध्ये माशांना आकर्षित करण्यासाठी मांस किंवा लहान मासे असे काहीतरी ठेवले जाते.
दिपकवन्नी ही माशांना गोंधळात टाकण्यासाठी प्रकाश स्रोत वापरण्याची जुनी पद्धत आहे. पूर्वी पॅराफिन किंवा रॉकेलच्या दिव्यांचा वापर माशांना विचलीत करण्यासाठी आणि नंतर हातातील जाळ्याने पकडण्यासाठी केला जात असे. आताच्या काळात हाय बीम टॉर्च वापरले जात आहेत.
ट्रॉलिंग ही मासेमारीची एक आधुनिक पद्धत आहे ज्यामध्ये मोठ्या जाळ्याचा वापर केला जातो. . ही पद्धत गोव्यात सामान्यतः व्यावसायिक मच्छीमारांकडून वापरली जाते.
गोव्यातील पारंपारिक मासेमारी पद्धती या राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. आधुनिक मासेमारी तंत्रामुळे गोव्यातील पारंपारिक मासेमारी पद्धती टप्प्याटप्प्याने बंद होत आहेत. या शाश्वत मासेमारीच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तळ्यांनी नटलेले निसर्गरम्य 'कुडतरी'