Akshata Chhatre
जर तुमचे पालक तुमच्याबद्दल सर्व काही विचारतात, पण जोडीदाराचा विषय टाळतात किंवा "तो/ती कशी आहे?" हे कधीच विचारत नाहीत, तर हा नाराजीचा पहिला संकेत आहे.
जोडीदाराचे शिक्षण, नोकरी, कपडे किंवा वागणं यावर विनाकारण टीका करणे, हे दर्शवते की पालकांना तुमच्या जोडीदाराचा स्वभाव पटलेला नाही.
"तू आधी असा नव्हतास, तिच्या/त्याच्या नादी लागून बदललास," असे टोमणे मारणे म्हणजे तुमच्या जोडीदाराप्रती त्यांच्या मनात राग असण्याचे लक्षण आहे.
जेव्हा तुम्ही लग्नाचा किंवा भविष्याचा विषय काढता आणि पालक लगेच विषय बदलतात, तेव्हा ते या नात्यासाठी तयार नाहीत हे समजून जा.
कौटुंबिक कार्यक्रमात किंवा सणासुदीला जोडीदाराला बोलवण्यास टाळाटाळ करणे, हे त्यांच्या नकाराचे प्रतीक असू शकते.
तुमच्या जोडीदाराने घरी फोन केला किंवा भेटायला आले तरी पालक त्यांच्याशी मोजकेच किंवा औपचारिक बोलत असतील, तर हा मोठा इशारा आहे.
पालकांच्या या वागण्यावर चिडण्यापेक्षा त्यांच्याशी शांतपणे संवाद साधा. त्यांच्या मनात नक्की कोणती भीती आहे हे जाणून घ्या आणि ती दूर करण्याचा प्रयत्न करा.