Sameer Amunekar
मुलं काही सांगत असतील तर मध्येच थांबवू नका. त्यांचं बोलणं शांतपणे ऐकलं गेलं, की “माझं मत महत्त्वाचं आहे” अशी भावना तयार होते.
फक्त पहिला क्रमांक आला तरच नाही, तर प्रयत्न केल्याबद्दलही शाबासकी द्या. यामुळे अपयशाची भीती कमी होते.
चुका म्हणजे शिकण्याचा भाग आहे. चूक झाली की रागावण्याऐवजी “यातून काय शिकलास?” असा प्रश्न विचारा.
कपडे, खेळ, वेळापत्रक याबाबत लहान निर्णय मुलांनाच घेऊ द्या. निर्णयक्षमतेमुळे आत्मविश्वास वाढतो.
“शेजाऱ्याचा मुलगा असा आहे…” ही वाक्यं मुलांचा आत्मविश्वास तोडतात. प्रत्येक मूल वेगळं आहे, हे लक्षात ठेवा.
घरातली छोटी कामं- पाण्याची बाटली भरणं, पिशवी आवरणं – अशी कामं दिल्यास स्वतःवर विश्वास निर्माण होतो.
पालकांचा आत्मविश्वास, बोलण्याची पद्धत आणि वागणूक मुलं नकळत शिकतात. तुम्ही कॉन्फिडंट असाल, तर मूलही तसंच होईल.