Sameer Amunekar
मुलांना “तुला काय वाटतं?” असं विचारून त्यांचं मत ऐका. यामुळं त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायला मिळतं.
चूक झाली म्हणून ओरडण्याऐवजी, त्यातून काय शिकता येईल हे सांगा. यामुळं अपयशाची भीती कमी होते.
गुण, खेळ, चित्रकला किंवा एखादी छोटी जबाबदारी चांगली पार पाडली तरी मनापासून कौतुक करा. यामुळं आत्मविश्वास वाढतो.
कपडे निवडणं, वेळापत्रक ठरवणं अशा छोट्या निर्णयांमध्ये मुलांना सहभागी करा. यामुळं निर्णयक्षमता मजबूत होते.
:मला जमत नाही" ऐवजी "मी प्रयत्न करतो" अशी भाषा वापरायला शिकवा. सकारात्मक विचार आत्मविश्वासाचा पाया असतो.
दुसऱ्या मुलांशी तुलना केल्यानं न्यूनगंड निर्माण होतो. प्रत्येक मूल वेगळं आणि खास आहे हे समजवा.
घरातील लहान कामं, स्वतःची बॅग आवरणं, पुस्तकांची काळजी घेणे अशा सवयी लावल्यानं आत्मभान वाढतं.