Sameer Amunekar
रोज एकाच वेळी झोपायला गेल्याने शरीराची जैविक घड्याळ (Body Clock) योग्यरित्या काम करते आणि झोप लवकर लागते.
स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेंदू जागृत ठेवतो. झोपण्याआधी किमान ३०–४५ मिनिटे मोबाईल वापर टाळा.
झोपण्याआधी कोमट दूध, कॅमोमाईल किंवा तुळशीचा चहा घेतल्याने शरीर शांत होते आणि झोप येण्यास मदत होते.
रात्री जड, तिखट किंवा तेलकट पदार्थ टाळा. हलका आणि वेळेवर घेतलेला आहार चांगल्या झोपेसाठी महत्त्वाचा आहे.
५ मिनिटे खोल श्वास-उच्छ्वास, ध्यान किंवा हलका स्ट्रेचिंग केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत होते.
खोलीत अंधार, शांतता आणि थंडावा ठेवा. आरामदायी उशी व गादी असल्यास झोपेची गुणवत्ता वाढते.
चालणे, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने रात्री शरीर थकते आणि झोप पटकन लागते.