Sameer Amunekar
खोटं न बोलणं, सत्याची बाजू घेणं हे लहानपणापासूनच शिकवा. पालकांनी स्वतः प्रामाणिक वागणं हा सर्वोत्तम धडा असतो.
आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक यांचा आदर करणं आणि लहान मुलांशी प्रेमाने वागणं ही सवय घरातूनच लागते.
स्वतःची कामं स्वतः करणं, वस्तू नीट ठेवणं यामुळे मुलांमध्ये जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण होतो.
चूक झाली तर ओरडण्याऐवजी शांतपणे समजावून सांगा. चुकांमधून शिकणं हेच खऱ्या संस्काराचं लक्षण आहे.
जास्त स्क्रीन टाइम टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवणं, संवाद साधणं हे मुलांच्या मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
सगळं लगेच मिळत नाही हे शिकवा. मेहनत, थांबण्याची सवय (patience) आणि अपयश स्वीकारणं हे आयुष्यात उपयोगी पडतं.
इतरांच्या भावना समजून घेणं, गरजू व्यक्तीला मदत करणं यामुळे मुलं माणुसकी जपणारी बनतात.