Sameer Amunekar
मोठ्यांप्रती आदर ठेवणं,घरातील आणि बाहेरील व्यक्तींशी नम्रपणे बोलणं. "कृपया", "धन्यवाद", "माफ करा" या शब्दांचा वापर करायला शिकवा.
स्वतःचे कपडे घालणं, वस्तू व्यवस्थित ठेवणं. जेवणानंतर आपलं ताट धुणं किंवा ठेवणं. घरातील छोट्या जबाबदाऱ्या पार पाडणं.
खोटं बोलणं चुकीचं आहे हे समजावणं. चूक झाली तर तिची कबुली देण्याची सवय लावणं.
वेळेवर उठणं, शाळेच्या वेळा पाळणं. अभ्यास आणि खेळ यामधला योग्य समतोल.
मुलांना रोज थोडं वाचन करायला प्रवृत्त करणं. गोष्टी सांगून त्यांच्या विचारशक्तीला चालना द्या.
मुलांना सकस अन्न खाण्याची सवय लावा. नियमित झोप आणि व्यायाम करायला लावा.