Sameer Amunekar
मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी रागावल्यास ते भीतीखाली जगू लागतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
“तो बघ किती हुशार आहे” असं सतत सांगणं मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतं. प्रत्येक मूल वेगळं असतं हे लक्षात ठेवा.
मुलांना वेळ न देता, मोबाईलमध्ये व्यस्त राहणं ही सवय त्यांच्यातही रुजते. त्यामुळे नात्यातील संवाद कमी होतो.
मुलांना स्वतःच्या समस्या, भावना सांगायच्या असतात. त्यांना ऐकून न घेणं म्हणजे त्यांना स्वतःपासून दूर लोटणं.
प्रत्येक मागणी लगेच पूर्ण करणं किंवा पूर्ण स्वातंत्र्य देणं यामुळे मुलं हक्काची आणि बेजबाबदार होतात.
पालकांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या नाहीत, तर मुलंही जबाबदारी टाळायला शिकतात. आदर्श घालणं महत्त्वाचं.
कामाच्या व्यापात मुलांसोबत बसून गप्पा मारायला वेळ न देणं ही मोठी चूक आहे. मुलं दूर गेल्यास नातं कमकुवत होतं.