Sameer Amunekar
लोह, झिंक, व्हिटॅमिन B12, प्रथिने यांचा आहारात अभाव असेल तर केस आधीच पांढरे होतात.
जेल, स्प्रे, कलर, शॅम्पू यांमध्ये असलेले केमिकल्स केसांचे नुकसान करतात.
ताण-तणावामुळे हार्मोन्स बिघडतात आणि केस वेळेपूर्वी पांढरे होतात.
दररोज ७-८ तास झोप न घेतल्यास केसांची वाढ आणि नैसर्गिक रंग दोन्हीवर परिणाम होतो.
फक्त पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक्सवर जगल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही.
नियमित तेल न लावल्याने केस कोरडे, कमकुवत होतात आणि रंग लवकर बदलतो.
धूम्रपान आणि जास्त कॉफी, चहा घेण्याची सवय केसांच्या मुळांना कमकुवत करून पांढरे केस वाढवते.