Avachitgad Fort: 'अवचितगड' शिवाजी महाराजांच्या तत्काळ निर्णयातून साकारलेला, पण मजबूत किल्ला

Sameer Amunekar

अवचितगड

रोहा या छोट्या शहरातून कुंडलिका नदीचा पूल ओलांडल्यावर अवचितगडाकडे जाता येते. हा किल्ला रोहापासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

इतिहास

इ.स. 9वे ते 10वे शतक या काळात शिलाहार राजांनी या किल्ल्याची बांधणी केल्याचे अवशेषांवरून दिसून येते.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

निजामशहाचा ताबा

काही काळ हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराजांचा ताबा

पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि बाजी पासलकर यांच्या देखरेखीखाली त्याची पुनर्बांधणी केली.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

शिलालेखाचा उल्लेख

किल्ल्याच्या एका बुरुजावर शके 1718 (इ.स. 1795-96) सालाचा उल्लेख असलेला शिलालेख आहे, ज्यावरून त्या काळातही किल्ल्याची दुरुस्ती झाल्याचे दिसते.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

‘अवचितगड’ नावाची उत्पत्ती

शिवरायांनी या किल्ल्याची बांधणी घाईघाईत केल्यामुळे त्याला ‘अवचितगड’ (अवचित म्हणजे अचानक तयार झालेला गड) असे नाव दिले. या कामात शेख महंमद यांनी शिवरायांना सहकार्य केले होते.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

ब्रिटिशांचा ताबा

इ.स. 1818 मध्ये कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी सूरगड, भोरपगड जिंकून लगेच अवचितगडही ताब्यात घेतला. मराठ्यांची सत्ता संपुष्टात आल्याने किल्ला पुन्हा परत मिळवण्याचा प्रश्नच आला नाही.

Avachitgad Fort | Dainik Gomantak

'दालचिनी' आहे नैसर्गिक 'ग्लो-बूस्टर'

Glowing Skin Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा