Sameer Amunekar
मुलांवर ओरडल्याने ते घाबरतात, पण त्यांना शिस्त लागत नाही. रागाच्या भरात बोलण्यापेक्षा शांतपणे त्यांच्याशी संवाद साधण्याची सवय लावा.
पालक जर स्वतः वेळेचे पालन करत नसतील, तर मुलेही तीच शिकतात. स्वतः वेळेवर उठणे, कामे वेळेत पूर्ण करणे हे पाहून मुले आपोआप शिस्तबद्ध होतात.
मुलांना 'मोबाईल नको' सांगण्याआधी तुम्ही स्वतः मुलांसमोर किती वेळ मोबाइल वापरता, याकडे लक्ष द्या. पालकांनी मोबाईल बाजूला ठेवून मुलांना वेळ दिला पाहिजे.
मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे घरात एकमेकांशी बोलताना आदराची आणि योग्य भाषेचा वापर करा, जेणेकरून मुलेही तीच संस्कृती शिकतील.
तुम्ही मुलांना दिलेले आश्वासन पाळण्याची सवय लावा. यामुळे मुलांमध्ये पालकांविषयी विश्वास निर्माण होतो आणि त्यांनाही दिलेला शब्द पाळण्याचे महत्त्व कळते.
घरासाठी बनवलेले नियम फक्त मुलांसाठी नसून सर्वांसाठी असावेत. पालकांनी स्वतः नियम पाळले तर मुले आनंदाने त्यांचे अनुकरण करतात.
मुलांचे म्हणणे न ऐकता केवळ त्यांना आदेश देऊ नका. आधी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते तुमची गोष्ट ऐकायला तयार होतात.