Parenting Tips: पालकांनो लक्ष द्या! 'या' 6 गोष्टी मुलांना सांगितल्या तर त्यांचा आत्मविश्वास ढासळतो

Sameer Amunekar

वडिलांनी आपल्या मुलाला काही गोष्टी न सांगणे, हे मुलांच्या मानसिक, भावनिक आणि आत्मविश्वासाच्या विकासासाठी फार महत्त्वाचं ठरू शकतं.

Parenting Tips | Dainik Gomantak

तू काहीच करू शकत नाहीस

या वाक्यामुळे मुलाचा आत्मविश्वास खचतो. त्याऐवजी, चुकलं तरी "पुन्हा प्रयत्न कर" असं सकारात्मक प्रोत्साहन द्यावं.

Parenting Tips | Dainik Gomantak

मुलं रडत नाहीत

भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाही. अशा विधानामुळे मुलं आपली भावना दडपतात, ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो.

Parenting Tips | Dainik Gomantak

अपेक्षा

आपल्या स्वप्नांचा भार मुलांवर टाकणं चुकीचं आहे. त्याऐवजी त्यांना त्यांच्या स्वप्नांनुसार मार्गदर्शन करावं.

Parenting Tips | Dainik Gomantak

मुलांचं मत

मुलाच्या मताकडे दुर्लक्ष केल्यास, तो बोलण्यापासूनच कदाचित मागे हटेल. ऐकणं आणि समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.

Parenting Tips | Dainik Gomantak

सांगेन तेच करायचं

हे वाक्य मुलात स्वावलंबन आणि निर्णयक्षमता वाढण्याऐवजी अधीनता निर्माण करतं.

Parenting Tips | Dainik Gomantak

स्वतःची ओळख

प्रत्येक मुलाची स्वतःची ओळख असते. त्याला ती शोधू द्यावी, त्याला वडिलांप्रमाणे "झालं पाहिजे" असा दडपण नको.

Parenting Tips | Dainik Gomantak
Trip Tips | Dainik Gomantak
फिरायला जाताना या गोष्टींचा काळजी घ्या