Sameer Amunekar
मोठ्यांचा आदर करणे, शुभेच्छा देणे, ‘धन्यवाद’ आणि ‘क्षमस्व’ म्हणण्याची सवय लावणे. इतरांसोबत प्रेमाने आणि आदराने वागण्याची शिकवण देणे.
स्वतःचे कपडे, खोली आणि शाळेचे साहित्य नीट ठेवण्याची सवय लावणे. नियमित हात धुणे, स्नान करणे, दात घासणे यासारख्या आरोग्यदायी सवयी अंगी बाणवणे.Dainik Gomantak
वेळेवर उठणे, गृहपाठ वेळेवर पूर्ण करणे, शाळेत वेळेवर जाणे या सवयी लावणे. जबाबदाऱ्या पूर्ण करणे आणि कोणत्याही कामाकडे गांभीर्याने पाहण्याची सवय लावणे.
रोज काहीतरी नवीन वाचण्याची आणि ज्ञान वाढवण्याची प्रेरणा देणे. चांगली पुस्तके, गोष्टी आणि सामान्यज्ञान वाढवणारे लेख वाचण्यास प्रोत्साहन देणे.
रोज थोडा वेळ खेळणे, व्यायाम करणे, बाहेरच्या खेळांमध्ये भाग घेणे. आरोग्यासाठी पोषक आहार घेणे आणि जंक फूड टाळण्याचे महत्त्व समजावणे.
घरातील आणि समाजातील लोकांना मदत करण्याची सवय लावणे. लहान भावंडांना मदत करणे, मित्र-मैत्रिणींसोबत सहकार्याने काम करणे आणि समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देणे.