Sameer Amunekar
उन्हाळी सुट्टी हा मुलांच्या जीवनात एक मौल्यवान काळ असतो. या सुट्टीचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता शिक्षण, संस्कार आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी केला तर त्याचा उपयोग दीर्घकाळासाठी होतो.
आपले सामान आवरणे, स्वतःचे कपडे घालणे/धुण्यास ठेवणे, टेबल पुसणे अशा लहान गोष्टींनी जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि स्वच्छतेचे महत्त्व समजते.
बागकाम, पक्षीनिरीक्षण, झाडांची माहिती देणारे खेळ – हे मुलांना निसर्गाशी जोडतात. या माध्यमातून त्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळते.
दिवसाचे वेळापत्रक तयार करून त्यात खेळ, वाचन, चित्रकला, छंद, आराम यांना स्थान द्या. यामुळे वेळेचे नियोजन आणि एकाग्रतेची सवय लागते.
पिगी बँक, छोटी खरेदी, पॉकेटमनी यांद्वारे मुलांना खर्च, बचत आणि नियोजनाचे प्राथमिक धडे द्या. यामुळे आर्थिक शिस्त निर्माण होते.
स्वयंपाक हा फक्त मोठ्यांचा प्रांत नाही. मुलांना साधे पदार्थ – जसे की पोळी लाटणे, दुध गरम करणे, सँडविच बनवणे – शिकवणे हे त्यांच्यात आत्मनिर्भरता निर्माण करते.