Sameer Panditrao
घरात पालकांचा आधार असणे हे मुलांसाठी सर्वात मोठे मानसिक कवच असते.
पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
मुलांनी सांगितलेल्या समस्यांकडे ‘लहान मुलांसारख्या’ म्हणून दुर्लक्ष करू नका. त्यांच्या दृष्टिकोनातून ती समस्या खूप मोठी असू शकते.
मुलांना फक्त यश आणि चांगले गुण मिळवण्यासाठी शिकवू नका. कमी गुण मिळाले म्हणून ओरडण्याऐवजी, ‘पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करूया’ असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
मुलांना त्यांच्या मनातली कोणतीही गोष्ट तुमच्याशी शेअर करता यावी असे वातावरण घरात ठेवा.
आपल्या मुलांना त्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसार वाढू द्या. त्यांच्यावर तुमच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे ओझे लादू नका.
पालक म्हणून तुमच्यावरही ताण असू शकतो. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही आनंदी आणि शांत असाल तरच ते वातावरण मुलांपर्यंत पोहोचेल.