Akshata Chhatre
प्रत्येक पालकांना वाटतं की आपलं मूल जबाबदार आणि समजूतदार व्हावं.
मुलांच्या संगोपनातील अनेक लहान गोष्टींपैकी पॉकेट मनी हा एक महत्त्वाचा भाग आहे.
पॉकेट मनी म्हणजे केवळ पैसे देणे नसून, मुलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना पैशांचे महत्त्व शिकवणे होय.
मुलांना लहानपणापासूनच पैशांचे महत्त्व कळते. यामुळे त्यांना खर्च करणे, बचत करणे आणि पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे शिकायला मिळते.
मुलांना पॉकेट मनी देण्याचे योग्य वय ७ ते ८ वर्षे मानले जाते. या वयात मुलांना पैशांचे महत्त्व समजू लागते.
पॉकेट मनीची रक्कम ठरवताना मुलांच्या गरजा आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
मुलांना पैसे देणे पुरेसे नाही, तर त्यांना पैशांचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवणेही महत्त्वाचे आहे.