Sameer Panditrao
25 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या एका खगोलशास्त्रीय घटनेबद्दल बोलाबाला केला जात आहे, ज्याला 'परेड ऑफ प्लॅनेट्स' (ग्रहांची परेड) असे नाव दिले गेले आहे.
वैज्ञानिक परिभाषेत तांत्रिकदृष्ट्या त्याला ‘ग्रहांचे संरेखन’ (प्लॅनेटरी अलाइनमेंट) म्हणतात.
ही घटना अनेक वेळा तीआपल्या अवकाशात दिसत आली आहे. 2022 मध्येही अशी घटना घडली होती आणि येत्या काही वर्षात पुन्हा देखील घडणार आहे.
डिसेंबर 2024 पासून आकाशात ग्रह दिसण्यास आधीच सुरुवात झालेली आहे. गुरु,शनी ग्रह डिसेंबर २४पासून संध्याकाळी दिसू लागले आहेत आणि ते फेब्रुवारी २५ पर्यंत दिसत राहतील.
मंगळ ग्रह जानेवारीमध्ये संध्याकाळच्या आकाशात उगवेल तर शुक्राने ९ जानेवारीस आधीच पूर्व विस्तार गाठला आहे.
बुध वगळता डोळ्यांना दिसणारे सर्व ग्रह जानेवारी ते २५ फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आकाशात संरेखित झाले आहेत.
ग्रहांच्या संरेखनाचा माणसांवर किंवा पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नाही मात्र एक सुंदर खगोलशास्त्रीय दृश्य मात्र आकाशात तयार होणार आहे.
पणजी येथील जुन्ता हाऊसमधील सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळा, खगोलप्रेमींसाठी, रोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत खुली असणार आहे.