Manish Jadhav
अशा अनेक वनस्पती आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आपल्यापैकी अनेक जणांनी परसबागेत पपईचे झाड लावले असेलच. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत.
आज (8 डिसेंबर) आपण आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी पपई कशी मदत करते याबद्दल जाणून घेणार आहोत.
आठवड्यातून तीनदा फक्त एक कप पपईच्या पानांचे पाणी प्यावे, असा सल्ला दिला जातो. पपईच्या पानांचे पाणी डेंग्यूच्या आजारांचा सामना करण्यास फायदेशीर आहे.
पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई व फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर ठेवतात.
पपईच्या पानांचे पाणी नियमित प्यायल्याने पेशी खराब होत नाहीत. या पानांच्या पाण्यातील अँटिऑक्सिडंट्स हृदयविकार, मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करु शकतात.
पपईच्या पानांचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेसारख्या पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. त्याशिवाय जळजळ कमी होते आणि आतड्यातील निरोगी जीवाणू वाढतात.
पपईच्या पानांचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करतात.