Sameer Amunekar
पपई ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असून ती नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी मदत करते.
पपईमुळे त्वचा उजळवते आणि ग्लो वाढवते. पपई डाग, मुरूम आणि काळे डाग कमी करते.
चेहऱ्यावर ओलावा टिकवून त्वचा मऊ आणि तजेलदार बनवते.
पपईचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून स्वच्छ करा. नंतर तयार केलेला पॅक आपल्या हलक्या हातांनी चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावा.
पॅक चेहऱ्यावर लावून सुमारे 10-15 मिनिटे वाळवून घ्यावा. त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
पपईमध्ये पपाइन (Papain) एन्झाइम असते, जे त्वचेला उजळते आणि मुरूमांवर प्रभावी ठरते.