Akshata Chhatre
पणजी कदंब बस स्थानकापासून २९ कि.मी.वास्को रेल्वे स्थानकापासून ४६ कि.मी. अंतरावर असलेले हरवळ्यातली लेणी ही ६ व्या शतकातील प्राचीन खडकात कोरलेले लेणी आहेत.
उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील ही लेणी 'पांडव लेणी' म्हणून ओळखली जातात. महाभारतातील पाच पांडवांनी त्यांच्या वनवासात या लेण्यांमध्ये आश्रय घेतला, अशी आख्यायिका आहे.
साखळी शहराजवळची ही लेणी बौद्ध लेणी शैलीत कोरलेली आहेत. लेण्यांची वास्तुकला साधी पण आकर्षक आहे. भिंती साध्या असून त्यावर कोणतीही चित्रे नाहीत. खडकाची रचना लॅटराइट दगडात कोरलेली आहे.
लेण्यांचे रहस्यमय स्वरूप अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करत आहे. लेण्यांमध्ये पाच कक्ष आहेत आणि मधल्या कक्षामध्ये भक्तांद्वारे पूजले जाणारे 'लिंग' आहे.
दुसऱ्या गुहेतील शिवलिंगावर ७ व्या शतकातील संस्कृत आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. शिवलिंग आणि शिलालेख भोज राजा कपालिवर्मन यांच्या काळातील आहे. या परिसरात रुदेश्वर मंदिर आणि धबधबा आहे.
भेट देण्याची वेळ: सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ (सर्व दिवस).