Akshata Chhatre
औरंगजेब हा इतिहासातील मोठा राजा मानला जातो. त्याच्या राज्याचा आवाका, सैन्यदल, तिजोरी ओसंडून वाहायची असं म्हणतात.
तुम्ही कधी विचार केलाय का, हा बादशाह औरंगजेब त्याच्या एवढ्या मोठ्या सैन्याला किती पैसे देत असेल? जी सेना त्याच्यासाठी कायम युद्धसाठी तयार असायची औरंगजेब त्यांना किती पगार देत असेल?
1658-1707 हा काळ इतिहासात औरंगजेबाच्या शासनाचा काळ म्हणून ओळखला जातो. या काळात त्याने अनेक भूभाग काबीज केले होते. त्याकाळात मुघल सेना सर्वशक्तिशाली होती असं म्हणतात.
औरंगजेबाच्या सैन्यात चार प्रकारचे विभाग होते. यामध्ये घोडेस्वार, पायदळ, तोफखाना आणि हत्ती यांचा समावेश होता. यात घोडेस्वारांना फार महत्व होतं, ज्यात जवळपास २ लाख सैनिक होते.
वतनदारीच्या अंतर्गत त्याकाळी सैनिकांना पैसे दिले जायचे. जिथे पायदळला ५ ते १० रुपये, घोडेस्वारांना २० ते ५० रुपये अशा प्रकारे पैसे दिले जायचे.
अधिकाधिक सैनिकांनी सैन्यात भरती व्हावं म्हणून राजाकडून त्यांना वतनदारी दिली जायची किंवा त्या जमिनीतून मिळणार मोबदला दिला जायचा.
औरंगजेबाच्या या नितीमुळे सैन्य टिकून राहायचं आणि सैन्याची वृद्धी सुद्धा व्हायची.