Akshata Chhatre
पंचायत मालिकेत रिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्विका अनवाणी हिने नुकतंच खुलं केलं की, तिला एका किसिंग सीनसाठी अजिबात कम्फर्टेबल वाटलं नाही.
जस्ट टू फिल्मी या मुलाखतीत तिने सांगितलं की, दिग्दर्शक अक्षत विजयवर्गीय यांनी तिला सांगितलं होतं की रिंकी आणि सचिव जी यांच्यात किसिंग सीन असणार आहे.
सान्विकाने दोन दिवस विचार करून अखेर हा सीन करण्यास नकार दिला.
तिच्या मते, ही मालिका प्रामुख्याने कुटुंब प्रेक्षकांसाठी आहे आणि तिला वैयक्तिकरित्या असं सीन करण्यात गैरसोयीचं वाटलं.
सान्विकाचा निर्णय मान्य करत निर्मात्यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केला आणि हा सीन हटवून त्याऐवजी टाक टॅंकवरचा प्रसंग दाखवला जो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.
असं असलं तरी, सचिव जी आणि रिंकीमधील प्रेमकथा ही मालिकेचं मोठं आकर्षण ठरली आहे. पहिल्या सिझनपासून सुरू झालेली ही कथा चौथ्या सिझनमध्ये आणखी खुलली, जेव्हा अखेर सचिव जीने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं.