शेफालीला झालेला आजार तुम्हालाही असू शकतो; शरीर देतं 'या' सूचना

Akshata Chhatre

शेफाली जरीवाला

'काटा लागा’ गर्ल शेफाली जरीवालाच्या अचानक निधनाच्या बातमीनं सर्वांनाच हादरवून सोडलं. अवघ्या ४२ व्या वर्षी ती हृदयविकाराच्या झटक्याने गेली, ही बाब अनेक तरुणांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी आहे.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

ब्लड प्रेशर

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिचं ब्लड प्रेशर खूप कमी झालं होतं आणि त्यामुळे ती कार्डियाक अरेस्टची शिकार झाली.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

हृदयविकार आणि स्ट्रोक

शरीर एवढा मोठा इशारा देत असतानाही आपण का दुर्लक्ष करतो? हृदयविकार आणि स्ट्रोकहे आजार अचानक होत नाहीत; त्यांच्या काही सूचक लक्षणांकडे वेळेत लक्ष दिलं, तर जीव वाचवता येतो.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

कार्डियाक अरेस्ट

हृदयाशी संबंधित तीन गंभीर समस्या म्हणजे कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक. कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक थांबतं, रक्तप्रवाह थांबतो आणि व्यक्ती बेशुद्ध पडते.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

छातीत दुखणं

हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे छातीत दुखणं, घाम येणं, श्वास घेण्यास त्रास होतो.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

स्मरणशक्ती

स्ट्रोकमध्ये मेंदूतील रक्तपुरवठा थांबतो किंवा रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे बोलणं, हालचाल, स्मरणशक्ती अशा अनेक गोष्टींवर परिणाम होतो.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

दुर्लक्ष

पूर्वसूचना म्हणून छातीत टोचल्यासारखं दुखणं, मानेत किंवा हातात मुंग्या येणं, श्वास घेण्यात अडचण, अचानक थकवा किंवा चक्कर येणं ही लक्षणं दिसतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

body giving warning signs| Cardiac Arrest | Dainik Gomantak

फक्त तेल कामाचं नाही, 'हा' पदार्थ विसरताय; केसांसाठी ठरतो गुणकारी

आणखीन बघा