Palakkad Fort: 300 वर्षांचा इतिहास अन् आजही दिमाखात उभा! केरळातील टिपू सुलतानचा 'पल्लकड किल्ला'

Manish Jadhav

पलक्कड किल्ला

केरळमधील पलक्कड किल्ला (Palakkad Fort), ज्याला 'टिपू सुलतानचा किल्ला' म्हणूनही ओळखले जाते, हा दक्षिण भारतातील सर्वात जतन केलेल्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे.

Palakkad Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक पार्श्वभूमी

हा किल्ला मुळात 1766 मध्ये म्हैसूरचा शासक हैदर अली याने बांधला होता. पुढे त्याचा मुलगा टिपू सुलतान याने या किल्ल्याची डागडुजी करुन तो अधिक भक्कम केला, म्हणूनच याला 'टिपूचा किल्ला' असेही म्हणतात.

Palakkad Fort | Dainik Gomantak

भौगोलिक महत्त्व

हा किल्ला पश्चिम घाटातील 'पलक्कड गॅप' मध्ये स्थित आहे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणाऱ्या व्यापारी आणि सामरिक मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता.

Palakkad Fort | Dainik Gomantak

वास्तुकलेचा नमुना

हा किल्ला एका मोठ्या मैदानावर वसलेला असून तो चौकोनी आकाराचा आहे. याची तटबंदी अतिशय भक्कम असून ती ग्रॅनाइटच्या दगडांनी बांधलेली आहे. किल्ल्याच्या सभोवताली एक खोल खंदक आहे, ज्यामध्ये आजही पाणी असते.

Palakkad Fort | Dainik Gomantak

ब्रिटिश आणि म्हैसूर संघर्ष

पल्लकड किल्ला अनेक युद्धांचा साक्षीदार राहिला आहे. 1790 मध्ये ब्रिटीशांनी जनरल मेडोजच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकला होता. टिपू सुलतान आणि इंग्रजांमधील तिसऱ्या युद्धात या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती

Palakkad Fort | Dainik Gomantak

किल्ल्यातील हनुमान मंदिर

किल्ल्याच्या आत एक प्रसिद्ध आणि प्राचीन हनुमान मंदिर आहे. असे मानले जाते की, या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय किल्ल्याची सफर पूर्ण होत नाही. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे मंदिर आहे.

Palakkad Fort | Dainik Gomantak

आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया

सध्या हा किल्ला 'भारतीय पुरातत्व विभागा'च्या देखरेखीखाली आहे. हा केरळमधील सर्वात सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असलेला किल्ला मानला जातो. पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे.

Palakkad Fort | Dainik Gomantak

खुलं मैदान आणि जेल

किल्ल्याच्या समोर 'कोट्टा मैदान' नावाचे मोठे मैदान आहे, जिथे पूर्वी सैन्याची परेड व्हायची. विशेष म्हणजे, या किल्ल्याचा एक भाग ब्रिटिश काळात तुरुंग (Jail) म्हणूनही वापरला जात असे.

Palakkad Fort | Dainik Gomantak

पर्यटनासाठी उत्तम

पलक्कड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा किल्ला पर्यटकांसाठी विनामूल्य खुला आहे. गडावरील हिरवळ, जुनी तोफ आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 ही भेट देण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

Palakkad Fort | Dainik Gomantak

Konkan Tourism: कोकणचा स्वर्ग 'दिवेआगर'! निळाशार समुद्र पाहण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती

आणखी बघा