Manish Jadhav
दिवेआगरचा समुद्रकिनारा साधारण 4 ते 5 किलोमीटर लांब पसरलेला आहे. हा किनारा अतिशय स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त असल्याने पर्यटकांची पहिली पसंती असतो.
येथील वाळू पांढरशुभ्र आणि मऊ आहे. किनाऱ्याला लागूनच असलेल्या सुरुच्या (Casuarina) झाडांच्या दाट रांगांमुळे या किनाऱ्याला एक वेगळेच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.
अलिबाग किंवा मुंबईच्या किनाऱ्यांच्या तुलनेत दिवेआगर येथे फारशी गर्दी नसते. त्यामुळे ज्यांना शांततेत वेळ घालवायचा आहे, अशा लोकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
येथील समुद्र उथळ असून लाटांचा वेग मध्यम असतो. त्यामुळे पर्यटक येथे सुरक्षितपणे समुद्रात पोहण्याचा किंवा लाटांशी खेळण्याचा आनंद घेऊ शकतात.
गेल्या काही वर्षांत येथे बॅनाना राईड, जेट स्की, बंपर राईड आणि पॅरासेलिंग सारखे साहसी खेळ सुरु झाले आहेत, ज्यामुळे तरुणाईची येथे मोठी गर्दी असते.
दिवेआगरच्या किनाऱ्यावरुन दिसणारा सूर्यास्त (Sunset) अत्यंत मोहक असतो. संध्याकाळच्या वेळी आकाशात उमटणारे विविध रंग आणि समुद्राचा आवाज मनाला उभारी देतो.
लहान मुलांसाठी आणि कुटुंबासाठी किनाऱ्यावर घोडागाडी (Horse Carriage) आणि उंट सफारीची सोय उपलब्ध आहे, ज्यामुळे समुद्रपर्यटनाची मजा द्विगुणित होते.