इम्रान खान यांना कोर्टाचा दणका

Manish Jadhav

पाकिस्तानात पुढच्या महिन्यात सार्वत्रिक निडणूक

पाकिस्तानात पुढच्या महिन्यात सार्वत्रिक निडणूक होणार आहे. येत्या काळात पाकिस्तानचे भविष्य कसे असेल हे या निवडणूकीवरुन स्पष्ट होणार आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. तत्पूर्वी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे.

Pakistan Elections | Dainik Gomantak

इम्रान खान

पाकिस्तानी न्यायालयाने ऑफिशियल सिक्रेट उघड केल्याप्रकरणी इम्रान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने ही माहिती दिली.

Former Pakistan Prime Minister Imran Khan | Dainik Gomantak

इम्रान यांच्या निकवर्तीयांवर कारवाई

पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांच्याव्यतिरिक्त, माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही 'सायफर' प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण सार्वजनिक गोपनीय दस्तऐवज आणि गोपनीय राजनयिक पत्रे (सिफर) बनवण्याशी संबंधित आहे.

Former Pakistan Prime Minister Imran Khan | Dainik Gomantak

'आंतरराष्ट्रीय षड्यंत्र'

दरम्यान, इम्रान खान यांनी 27 मार्च 2022 रोजी एका रॅलीत काही कागदपत्रे दाखवत दावा केला होता की, हे त्यांचे सरकार पाडण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय षड्यंत्र' असल्याचा पुरावा आहे.

Former Pakistan Prime Minister Imran Khan | Dainik Gomantak

इम्रान खान यांच्यावर आरोप

इम्रान खान आणि कुरेशी यांनी या कागदपत्रांचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2023 मध्ये त्यांना आरोपी बनवण्यात आले होते. मात्र, दोघांनीही स्वत:ला निर्दोष घोषित केले होते.

Former Pakistan Prime Minister Imran Khan | Dainik Gomantak

इम्रान यांच्या पक्षाचे म्हणणे काय?

रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी हा निकाल दिला. खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने या घडामोडीची पुष्टी केली. पक्षाने म्हटले की, ते "खोटे प्रकरण" असल्याचे सांगितले.

Former Pakistan Prime Minister Imran Khan | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी