Pakistan: दहशतवाद्याची पार्टी लढवणार इलेक्शन

Manish Jadhav

पाकिस्तानात रणसंग्राम

पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच आता, पाकिस्तानात निवडणुका होणार आहेत. मात्र, सध्या एका जागतिक दहशतवादी हाफिज सईची चांगलीच चर्चा रंगली आहे. चला तर जाणून घेऊया...

Pakistan Election | Dainik Gomantak

हाफिज सईदचा पक्ष

हाफिज सईदचा राजकीय पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) ने 8 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

Hafiz Saeed | Dainik Gomantak

सर्व जागा लढवणार

हाफिज सईदच्या पक्षाने सर्व संसदीय आणि राज्य विधानसभेच्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hafiz Saeed | Dainik Gomantak

दहशतवाद्याचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणार

हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही या निवडणुकीत नशीब आजमावणार आहे. तो नॅशनल असेंब्ली मतदारसंघ NA-127 लाहोरमधून निवडणूक लढवणार आहेत.

Hafiz Saeed | Dainik Gomantak

हाफिज सईदच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह

हाफिज सईदचा राजकीय पक्ष पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचे चिन्ह खुर्ची आहे.

Hafiz Saeed | Dainik Gomantak Dainik Gomantak

बंदीच्या आधी हाफिज सईदच्या पक्षाचे 'हे' नाव

PMML ने 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिल्ली मुस्लिम लीग, बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा राजकीय चेहरा म्हणून भाग घेतला होता. मात्र अपयश मिळाले होते.

Hafiz Saeed | Dainik Gomantak

आंतरराष्ट्रीय दबावाखाली

आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने जमात-उद-दावा आणि त्याच्या राजकीय गट मिल्ली मुस्लिम लीगवर बंदी घातली तेव्हा त्याचे नाव बदलून पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग असे ठेवले.

Hafiz Saeed | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी