Manish Jadhav
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, एक मोठी अपडेट समोर आली आहे.
इस्रायली सैनिकांकडून गुप्त माहिती मिळवण्यासाठी हमास आता इराणी महिलांची मदत घेत आहे. या इराणी महिलांचे न्यू़ड फोटो पाठवून इस्रायली सैनिकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) कडून काही महिलांना या कामासाठी प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महिला हिब्रू भाषेत पारंगत होत्या.
इराणी महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रायली सैनिकांशी संपर्क साधला. यानंतर त्या त्यांना व्हिडिओ कॉल करायाच्या आणि न्यूड फोटो पाठवायच्या.
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, इराण इंटरनॅशनल या वृत्तवाहिनीने इस्रायली सैनिकांच्या हनीट्रॅपबाबत हा खुलासा केला आहे. या महिला इस्रायली सैनिकांशी हिब्रू भाषेत बोलून त्यांचे न्यूड फोटो पाठवत होत्या, असे या अहवालात म्हटले आहे.
इराणने आपल्या मशाद शहरात हिब्रू भाषिक महिलांच्या गटाचा वापर केला. ज्याला इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने प्रशिक्षण दिले होते. या महिलांनी इस्रायली सैनिकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियावर बनावट नावाने प्रोफाइल तयार केले होते.
इस्रायली सैनिकांकडून मिळवलेली गुप्त माहिती या इराणी महिलांनी हमासपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली आहे.