ICC Test Rankings: पाकिस्तानचा पराभव अन् टीम इंइियाचे नुकसान; कसोटी क्रमवारीत घसरण

Manish Jadhav

पाकिस्तानला झटका

दक्षिण आफ्रिकेने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. पाकिस्तानच्या या पराभवाचा टीम इंडियालाही मोठा फटका बसला.

Pakistan | Dainik Gomantak

टीम इंडियाला फटका

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावलेला आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यापासून वंचित राहिलेल्या टीम इंडियाला आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला मागे सोडले.

Team India | Dainik Gomantak

घसरण

ताज्या ICC कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची एका अंकाने घसरण झाली. टीम इंडियाची जागा आता दक्षिण आफ्रिकेने घेतली आहे.

Team India | Dainik Gomantak

टीम इंडिया तिसऱ्या स्थानी

आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेचा निकाल येईपर्यंत टीम इंडिया दुसऱ्या स्थानी होती. मात्र आता, दक्षिण आफ्रिका 112 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर 109 रेटिंग गुणांसह टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

Team India | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलिया नंबर 1

126 रेटिंग पॉइंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ बनला आहे.

Aus | Dainik Gomantak

58 धावांचे लक्ष्य

केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर 58 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

South Africa | Dainik Gomantak
आणखी बघा