Painkiller Facts: पेनकिलर नेमके कसे काम करते? मेंदूवर काय होतो परिणाम?

Sameer Panditrao

पेनकिलर

आपल्याला वेदना होताच आपण लगेच पेनकिलर घेतो. पण ही गोळी घेताच वेदना इतक्या लवकर कशी थांबते? याचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊया.

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

वेदना

दुखापत झाली की सिग्नल थेट मेंदूपर्यंत जातो. मेंदू सांगतो — “येथे दुखत आहे”. वेदना म्हणजे शरीराचा इशारा, जो सांगतो की काहीतरी बिनसलं आहे.

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

शरीरात काय घडतं?

दुखापत झाल्यावर शरीर अनेक रसायनं तयार करतं. जखमी भागात रक्तपुरवठा वाढतो. इथे पांढऱ्या रक्तपेशी येतात आणि जखम भरून काढण्याचं काम सुरू करतात.

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

प्रोस्टॅग्लॅंडिन

जखमी भागात तयार होणाऱ्या रसायनांपैकी महत्त्वाचं नाव – Prostaglandin. हे रसायनच वेदना, सूज आणि जळजळ निर्माण करतं.

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

नेमकं काय करतात?

पॅरासिटामॉल, ब्रुफेन सारखी औषधं रक्तात मिसळून दुखापतीच्या जागी आणि मेंदूपर्यंत पोहोचतात. ती प्रोस्टॅग्लॅंडिन तयार होणे थांबवतात, म्हणून मेंदूला वेदनेचा सिग्नलच मिळत नाही.

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

वेदना बरी

ही औषधं जखम बरी करत नाहीत, तर फक्त मेंदूला तात्पुरता “Silent Mode” मध्ये टाकतात. वेदनास्थळी असलेलं मूळ नुकसान लपून राहतं आणि कधी कधी वाढतही जातं.

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

धोकादायक!

सतत पेनकिलर घेतल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर घ्या. (टीप: ही माहिती प्रकाशित रिपोर्ट्सवर आधारित आहे.)

Painkiller mechanism | Prostaglandin role | Dainik Gomantak

घोरणे कमी करण्यासाठी ROOT CAUSE कुठून शोधायची?

Snoring