Sameer Panditrao
झोपेत श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाला की हवा नीट प्रवाहित होत नाही.
या अडथळ्यामुळे कंप तयार होतो आणि त्यातून घोरण्याचा आवाज ऐकू येतो.
यामागील प्रमुख कारणे: जास्त वजन, इन्शुलिन रेझिस्टन्स, मान-चेहऱ्यावरील चरबी, नाकातील अडथळे, क्रॉनिक इन्फ्लेमेशन ही सर्व कारणे मिळून शरीरातील ऑक्सिजन कमी करतात.
फंक्शनल मेडिसिननुसार, घोरणे हे एक महत्त्वाचे लक्षण. त्यामागील ROOT CAUSE शोधणे आवश्यक आहे. कारण हे Obstructive Sleep Apnea (OSA) चे पहिले संकेत असू शकते.
झोपेत श्वास थांबणे, मेंदूला ताण, रक्तातील ऑक्सिजन घट, शरीरात Stress Response वाढ
या सर्वांचा परिणाम म्हणजे हृदयावर ताण आणि मेटाबॉलिक हेल्थ ढासळणे.
संशोधनानुसार घोरण्याचा थेट संबंध इन्शुलिन रेसिस्टन्स, टाइप 2 डायबेटिस, हायपरटेंशन, फॅटी लिव्हर, हार्ट डिसीज व स्ट्रोक, वजन वाढ यांच्याशी येतो.
रक्तातील ऑक्सिजन पातळी वारंवार कमी, हृदय धडधडणे, मेंदूला ताण, शरीर आतून सतत संघर्षाच्या स्थितीत यामुळे पुढे अनेक दीर्घकालीन समस्या तयार होतात.
घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका. हे तुमच्या मेटाबॉलिक, कार्डिअक आणि ब्रेन हेल्थचे सुरुवातीचे अलार्म सिग्नल असू शकते.