Sameer Amunekar
दिवसभराची धूळ आणि प्रदूषण काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी माइल्ड क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचा श्वास घेऊ शकते.
चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या साहाय्याने किंवा स्प्रेने गुलाब पाणी लावा. हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते आणि त्वचेचा pH स्तर संतुलित राखून ताजेतवाना लूक देते.
रात्री चेहऱ्याला ताजे कोरफड जेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला खोलवर हायड्रेट करून मुलायम बनवतात.
जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल, तर बदामाच्या तेलाचे २ थेंब चेहऱ्याला लावून हलका मसाज करा. यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा मऊ आणि चमकदार दिसतो.
केवळ चेहराच नाही, तर ओठ मुलायम राहण्यासाठी रात्री न विसरता लिप बाम किंवा साजूक तूप लावा. यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे टाळण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी रिंग फिंगरने आय क्रीम किंवा कोरफड जेलने मसाज करा. यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.
सौंदर्यासाठी ७-८ तासांची शांत झोप अत्यंत महत्त्वाची आहे. झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास पाणी प्या, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल.