Sameer Amunekar
आंबोलीला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हटले जाते. कोकणातील सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट वळणावळणाच्या रस्त्यांनी आणि दाट धुक्याने वेढलेला असतो, जो पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.
पावसाळ्यात येथील 'आंबोली मुख्य धबधबा' रौद्र आणि सुंदर रूप धारण करतो. पर्यटकांसाठी सुरक्षितपणे भिजण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
येथील सनसेट पॉईंटवरून कोकणच्या दऱ्यांचे आणि हिरव्यागार डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसते. फोटोग्राफीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
हिरण्यकेशी नदीचा उगम जेथून होतो, तिथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवण्यासाठी येथे नक्की भेट द्या.
आंबोली हे वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींसाठी ओळखले जाते. येथे दुर्मिळ बेडूक, फुलपाखरे आणि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात.
आंबोलीपासून जवळच कावळेसाद पॉईंट आणि नांगरतास धबधबा आहे. तसेच इथून गोवा आणि सिंधुदुर्गचे किल्ले देखील काही तासांच्या अंतरावर आहेत.