Manish Jadhav
उंची आणि सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या बुर्ज खलिफाचे एक अतिशय खास आणि सिक्रेट पेंटहाऊस आता विक्रीसाठी काढण्यात आले आहे.
दुबईतील एका हाय-प्रोफाइल सेलिब्रिटीसाठी पहिल्यांदा बुक केल्यानंतर हे अनोखे पेंटहाऊस 13 वर्षे सिक्रेट ठेवण्यात आले होते. आता हे आलिशान डुप्लेक्स पेंटहाऊस $51 दशलक्ष (अंदाजे ₹443.33 कोटी) किमतीला विकले जाणार आहे.
बुर्ज खलिफाचे वरचे 40 मजले कमर्शियल ऑफिससाठी रिझर्व्ह आहेत, परंतु हे पेंटहाऊस अशा काही निवासी युनिट्सपैकी एक आहे जे खरेदी करणे स्वप्नापेक्षा कमी नाही. या एक्सक्लूसिव्हच्या विक्रीची जबाबदारी इन्व्हेस्ट दुबई रिअल इस्टेटचे सीईओ असद खान यांच्यावर आहे. ते या पेंटहाऊसला "पृथ्वीवरील सर्वोत्तम ट्रॉफी प्रॉपर्टी" मानतात.
हे डुप्लेक्स पेंटहाऊस बुर्ज खलिफाच्या 107व्या आणि 108व्या मजल्यावर आहे, जे 21,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. जमिनीपासून 460 मीटर (1,509 फूट) उंचीवर असल्याने हे पेंटहाऊस जगातील सर्वात उंच निवासी मालमत्ता आहे.
या पेंटहाऊसच्या खरेदीदारांना 12 पार्किंग स्पेस, प्रायव्हेट गेटेड गार्डन, तीन अत्याधुनिक जिम, टेनिस कोर्ट आणि पर्सनल इंटरनल एलिवेटर यासारख्या सुविधा मिळतील. याशिवाय, खास स्कायलाइन-व्ह्यू जकूझी आणि भव्य स्विमिंग पूलचा आनंद घेता येईल. त्याच्या खरेदीदाराला बुर्ज खलिफाच्या 123व्या मजल्यावर असलेल्या प्रायव्हेट लाउंजमध्ये एक्सक्लूसिव्ह अॅक्सेस मिळेल.
गेली 13 वर्षे हे पेंटहाऊस रिकामे होते, परंतु 2022 मध्ये उद्योजक कार्ल हद्दाद आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदाराने ते खरेदी केले होते. तथापि, हे आलिशान पेंटहाऊस खरेदी करणाऱ्याला ते परफेक्ट करण्यासाठी अतिरिक्त $4.9 दशलक्ष (अंदाजे ₹42.6 कोटी) खर्च करावे लागतील.