Akshata Chhatre
सध्या सर्वात अधिक चर्चा जर का कोणाची होत असेल तर ती म्हणजे 'सिंदूर' या शब्दाची. भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' म्हणून ओळखलं जातं.
हिंदू पौराणिक कथांमध्ये गौरी-पार्वती यांचे विवाहबद्ध स्त्रीत्वाचे प्रतीक म्हणून सिंदूराला खूप महत्त्व आहे.
भारतीय संस्कृतीत सिंदूर म्हणजेच कुंकवाला खूप महत्व आहे. ते स्त्रीच्या सौभाग्यचं प्रतीक आहे, पण मग या सिंदूरचा शोध लागला तरी कुठून?
सिंदूरचा उगम सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीत म्हणजेच हरप्पा संस्कृतीत सुमारे ५००० वर्षांपूर्वी झाला.
हरप्पा संस्कृतीत विवाहित स्त्रिया त्यांच्या मस्तकाच्या मध्यरेषेवर सिंदूर लावत असत. हे विवाहित असण्याचं प्रतीक होतं आणि स्त्रीच्या सामाजिक स्थानाचे द्योतक मानलं जायचं.