Sameer Amunekar
संत्र हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. हे केवळ चविष्टच नाही, तर त्यामध्ये अनेक पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्म असतात.
संत्रीमध्ये विटामिन C भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. संत्रं सर्दी, खोकला आणि संसर्गापासून बचाव करण्यास उपयुक्त असतं.
संत्रामध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
संत्रामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी आणि उजळ बनवतात. पिंपल्स कमी करण्यास आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत होते.
व्हिटॅमिन A आणि कॅरोटिनॉइड्स डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात. मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव होतो.
संत्रामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
कमी कॅलोरी आणि जास्त फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. नैसर्गिक साखर असल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते.