Akshata Chhatre
७ मे रोजी भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर मिसाइल हल्ला केला आणि फक्त 25 मिनिटांत भारताने पाकिस्तानचे 9 दहशदवादी तळ उद्ध्वस्त केले.
हा हल्ला मंगळवारी रात्री १:०५ ते १:३० या वेळेत झाला. भारतीय सेना, नौदल आणि वायुदल यांनी मिळून ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानच्या विरोधात कारवाई केली.
मुझफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, रावळकोट, चक्सवारी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवाल अशा ठिकाणी भारताने हल्ला केलाय.
ही सर्व ठिकाणं लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होती. भारताकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात किमान ७० दहशतवादी ठार, काही वरिष्ठ कमांडरही होते.
हल्ला फक्त दहशतवादी ठिकाणांवरच केंद्रित असून यात कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठाण्यावर किंवा सामान्य नागरिकांवर हल्ला केलेला नाही.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी हा हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर असल्याची माहिती दिलीये.