तब्बल 32 खेळाडूंपैकी 'या' तिघांनाच संपूर्ण द. आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियात संधी

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका दौरा

भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर 2023 महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.

Team India | BCCI

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

10 डिसेंबर 2023 रोजी सुरु होणारा हा दौरा 7 जानेवारी 2024 रोजी संपेल. या दौऱ्यात भारताला 3 टी२०, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

India vs South Africa

भारतीय संघाची घोषणा

या तिन्ही मालिकांसाठी 30 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे.

Team India | BCCI

32 खेळाडूंची निवड

या तिन्ही मालिकांसाठी भारताच्या निवड समितीने तीन वेगवेगळे संघ निवडले आहेत. तीन संघात मिळून बीसीसीआयने एकूण 32 खेळाडूंची निवड केली आहे.

Team India | BCCI

तीनच खेळाडू कायम

विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या तिन्ही संघात केवळ तीनच खेळाडू कायम आहेत.

Shreyas Iyer | BCCI

संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा भाग

फलंदाज श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार हे तीनच असे खेळाडू आहेत, जे संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा म्हणजेत तिन्ही भारतीय संघाचा भाग असणार आहेत.

Mukesh Kumar | BCCI

ऋतुराजला पहिल्यांदाच संधी

श्रेयस आणि मुकेश हे दोघेही यापूर्वी भारताकडून तिन्ही प्रकारात खेळले आहेत, तर ऋतुराजला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली आहे.

Ruturaj Gaikwad

टीम इंडियाचा गोलंदाज मुकेश कुमारचे शुभमंगल!

Mukesh Kumar Wedding | X/DelhiCapitals
आणखी बघण्यासाठी