Akshata Chhatre
आजच्या डिजिटल युगात प्रेम फक्त भेटूनच नाही तर ऑनलाईन देखील जुळू शकतं.
मोबाईल अॅप्स, सोशल मीडियामुळे प्रेम शोधणं सोपं झालंय . मैत्रीपासून ते विवाहापर्यंतचा प्रवास आता स्क्रीनवर सुरू होतो.
टिंडर, बंबल या अॅप्सनी अनेकांच्या प्रेमकथा सुरू केल्या. चॅटिंग, व्हिडीओ कॉल्स, वर्च्युअल डेट्स… हे नातं अंतर असूनही जवळीक निर्माण करतं.
ऑनलाइन प्रेम करताना विश्वास ठेवणं गरजेचं आहे, पण त्याबरोबरच वैयक्तिक माहिती शेअर करताना खबरदारीही घ्या.
प्रेम फुलताना फसवणुकीची शक्यता असते. व्हर्च्युअल नात्यांना वेळ द्या, खरी ओळख जाणून घ्या.
ऑनलाइन प्रेम हे आजच्या पिढीचं प्रतिबिंब आहे. अंतर असलं तरी भावनांची उब जिवंत ठेवणारा एक नवा संवाद इथे घडतो.