Akshata Chhatre
आजकाल लग्नाची तयारी फक्त घरच्यांच्या ओळखीपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक जोडपी ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइट्सच्या माध्यमातून एकमेकांना भेटतात, संवाद साधतात आणि विचारपूर्वक पुढे लग्नाच्या दिशेने पावलं टाकतात.
मात्र अशा प्लॅटफॉर्मवर आयुष्याचा जोडीदार शोधताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक ठरतं.
नेहमी नामांकित आणि विश्वासार्ह अशा मॅट्रिमोनियल साइट्सचाच वापर केला पाहिजे. या साइट्स वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवतात आणि संभाव्य जोडीदाराची पार्श्वभूमी नीट तपासतात. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.
सुरुवातीच्या ओळखीच्या काळात तुमचा घरचा पत्ता, ऑफिसची माहिती, आर्थिक स्थिती यासारखी कोणतीही खाजगी माहिती शेअर करू नका.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची घाई करणं टाळावं. कितीही संवाद झाला असला, तरी त्यांची पार्श्वभूमी नीट समजून न घेताच निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं.
ऑनलाइन जगात जसे सुंदर प्रोफाइल्स असतात, तसे फसवणूक करणारे बनावट प्रोफाइल्सही असतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक गोष्ट तपासून पाहणं आवश्यक आहे.