Manish Jadhav
कांदा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कांदा केवळ चव वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही, तर त्यामध्ये पोषकतत्त्वांचे भरपूर प्रमाण आहे.
आज (24 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कांद्याच्या फायद्याविषयी जाणून घेणार आहोत.
कांद्यात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व "C" असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. संसर्गांपासून संरक्षण मिळते आणि सर्दी-खोकल्यावर फायदेशीर ठरतो.
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचा घटक असतो, जो हृदयाच्या आरोग्यास मदत करतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतो आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो.
कांद्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्थेस मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतो. पचन सुधारण्यासाठी रोजच्या आहारात कच्चा कांदा समाविष्ट करावा.
कांद्यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. मधुमेहींसाठी फायदेशीर अन्न घटक मानला जातो.
कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेला संक्रमणांपासून वाचवते. मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरतो.
कांद्याचा रस केसांच्या मुळांना पोषण देतो आणि केस गळती रोखतो. डोक्यात झालेला कोंडा कमी करण्यास मदत करतो.
कांद्यात असलेल्या सल्फरयुक्त घटकांमुळे हाडे मजबूत राहतात. संधिवात आणि हाडांसंबंधी आजारांवर उपयुक्त ठरतो.
कांद्यातील सल्फरयुक्त घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. मोतीबिंदू आणि अन्य डोळ्यांचे आजार टाळण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित राहते. उष्णतेच्या झटक्यांपासून बचाव करतो.